दरड कोसळल्याने कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प

0
130

कोकण रेल्वेच्या जुने गोवे येथील रेल्वे मार्गावरील बोगद्याला भगदाड पडून पावसाचे पाणी आणि माती रुळावर साचल्याने कोकण रेल्वेची वाहतूक काल ठप्प झाली. कोकण रेल्वे प्रशासनाकडून माती व पाणी हटविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. मात्र जुने गोवे येथे जोरदार पाऊस पडत असल्याने माती हटविण्याच्या कामावर विपरित परिमाण होत आहे.