दबावाखाली कोवॅक्सिन लसीला मंजुरी नाही : केंद्र

0
10

कोवॅक्सिन लसीच्या वापराला मंजुरी देण्यासाठी केंद्र सरकारवर बाह्य दबाव होता, अशा आशयाच्या काही बातम्या माध्यमांमध्ये आल्या होत्या. त्यावर काल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्टीकरण देत आरोपांचे खंडन केले.

राजकीय दबावामुळे कोरोनावरील कोवॅक्सिन लसीला लवकर मंजुरी देण्यात आली, असा आरोप करण्यात येत होता. त्यावर असा कोणताही राजकीय दबाव नव्हता, या सर्व बातम्या अफवा परसरवणार्‍या आहेत. कोवॅक्सिन लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देताना सर्व नियमांचे पालन करण्यात आले होते, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.