दक्षिण गोव्यात 21 मेला 4 तासांसाठी वीज खंडित

0
13

रविवार दि. 21 मे रोजी मान्सूनपूर्व कामांसाठी दक्षिण गोव्यातील वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याची माहिती काल वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली. या दिवशी दक्षिण गोव्यात सुमारे 3 ते 4 तास वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. दरम्यान, राज्यातील सर्व चाळीसही मतदारसंघात भूमिगत वीजवाहिन्या घालण्याचे काम सुरू झाले असल्याची माहितीही ढवळीकर यांनी यावेळी दिली. या कामावर 60 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.