‘त्या’ निवासी संकुलांसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग अनिवार्य

0
6

धोरण अधिसूचित

गोवा सरकारने जल व्यवस्थापन तंत्र आणि पावसाचे पाणी गोळा साठवण्याच्या आणि भूजलाचे पुनर्भरण करण्याच्या पद्धतीसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग (सुधारणा) २०२२ चे धोरण अधिसूचित केले आहे. या धोरणानुसार २ हजार चौरस मीटर आणि त्यावरील क्षेत्रफळातील अपार्टमेंटसह निवासी संकुलांसाठी ते अनिवार्य आहे. १५०० चौरस मीटर आणि त्यावरील क्षेत्रफळाच्या भूखंडावरील व्यावसायिक संकुल, १० हजार चौरस मीटर आणि त्यावरील क्षेत्रफळावरील औद्योगिक युनिट, सर्व सरकारी इमारती, सरकारी शाळा आणि महाविद्यालये रेन वॉटर हार्वेस्टिंग घेतले जाणार आहे.

या धोरणात प्रत्येक प्रकारच्या इमारती, घरासाठी प्रतिपूर्ती आधारावर अनुदान देखील दिली जाणार आहे. वैयक्तिक कुटुंब, निवासी घरांसाठी रेनवॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम समाविष्ट करण्यासाठी लागणार्‍या खर्चाच्या ५० टक्क्यापर्यंत अनुदान किंवा एक लाख रुपये यापैकी जे कमी असेल ते दिले जाईल. निवासी संकुल, अपार्टमेंट, इमारती, खासगी गृहनिर्माण संस्था, खाजगी शाळा, महाविद्यालयासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा समाविष्ट करण्यासाठी लागणार्‍या खर्चाच्या ५० टक्क्यांपर्यंत अनुदान किंवा ५ लाख रुपये यापैकी जे कमी असेल ते दिले जाणार आहे.