तेजस्वी यादव यांची 8 तास ईडी चौकशी

0
18

लँड फॉर जॉब्स प्रकरणात ईडीने बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची काल सुमारे 8 तास चौकशी केली. तेजस्वी यादव हे सकाळी 11.30 वाजता पाटणा येथील बँक रोड येथील ईडी कार्यालयात पोहोचले होते. रात्री 8 वाजता पाटणा ईडी कार्यालयातून बाहेर पडून त्यांनी विजयाची निशाणी दाखवली. यावेळी समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. ईडीच्या 12 अधिकाऱ्यांच्या पथकाने त्यांना 60 प्रश्न विचारले. या चौकशीदरम्यान भाऊ तेज प्रताप आणि बहीण मीसा भारतीही ईडी कार्यालयात पोहोचले होत्या. याआधी सोमवारी ईडीने आरजेडी सुप्रीमो लालू यादव यांची याच प्रकरणात 10 तास चौकशी केली होती.