तेजप्रताप यादव यांची राजदमधून हकालपट्टी

0
4

राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी आपला मोठा मुलगा तेजप्रताप यादव यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे. तसेच तेजप्रताप यादव यांना कुटुंबातून देखील बेदखल करण्यात येत असल्याचे लालूप्रसाद यांनी म्हटले आहे. लालूप्रसाद यांनी सोशल मीडियावर याबाबत माहिती देताना इथून पुढे आता तेजप्रताप यांची पक्षात आणि कुटुंबासाठी कोणतीही भूमिका नसेल असे स्पष्ट केले आहे. तेजप्रताप याला आता पार्टी आणि कुटुंब यामध्ये कोणतीही भूमिका असणार नाही. मी त्याला पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करत आहे, असे लालूप्रसाद यादव यांनी म्हटले आहे. तेजप्रताप यादव यांनी त्यांच्या रिलेशनशिपबद्दल जाहीर कबुली देताना मी अनुष्का यादवसोबत गेल्या 12 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर लालूप्रसाद यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. तर तेजप्रताप यांनी, मला आणि माझ्या कुटुंबाला बदनाम करण्याचा उद्देश असल्याचे म्हटले आहे.