तीन-चार दिवसांत मिळेल डिस्चार्ज

0
195

>> श्रीपाद नाईक यांनी दिली माहिती

देवाची कृपा आणि सर्वांच्या आशीर्वादाने माझ्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. येत्या चार-पाच दिवसात इस्पितळातून डिस्चार्ज मिळणार असून त्यानंतर आपण सर्वांना भेटणार आहे. कृपया मला भेटण्यासाठी इस्पितळात येऊन गर्दी करू नका, असे भावनिक उद्गार केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी काल काढले.
गेल्या ११ जानेवारीला उत्तर कर्नाटकातील गोकर्ण येथे जात असताना श्रीपाद नाईक यांच्या कारगाडीला झालेल्या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. तर, त्यांच्या पत्नी विजया नाईक यांचे निधन झाले आहे.
दरम्यान, आयुष मंत्रालयाचा तात्पुरता ताबा किरण रिजिजू यांच्याकडे देण्यात आला आहे.

मोदींकडून पुन्हा चौकशी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मंगळवारी दुसर्‍यांदा आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची चौकशी केली आणि जलद स्वास्थ्य लाभावे यासाठी शुभेच्छा दिल्या. गेल्या शुक्रवारी पंतप्रधान मोदी यांनी श्री. नाईक यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची चौकशी केली होती.