तिसर्‍या लाटेच्या मुकाबल्यासाठी सोमवारपासून प्रशिक्षण : मुख्यमंत्री

0
128

>> बालरोग तज्ज्ञ, परिचारिकांना प्रशिक्षित करणार

राज्यात कोरोनाची तिसरी लाट आल्यास तिचा यशस्वीपणे सामना करता यावा, यासाठी बालरोग तज्ज्ञांना आणि परिचारिकांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्याचे काम सोमवार दि. ७ जूनपासून सुरू करण्यात येणार आहे. तसेच मुलांसाठीच्या अतिदक्षता विभागासाठी लागणारी वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्याचे काम दि. १० जूनपासून हाती घेण्यात आल्याची माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी दिली.

तिसर्‍या लाटेचा यशस्वीपणे सामना करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राज्य कृती दलाच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सावंत यांनी दिली.

तिसर्‍या लाटेत राज्यातील लहान मुलांना मोठ्या संख्येने कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती असल्याच्या पार्श्‍वभूमीवर लहान मुलांवर उपचार करण्यासाठी लागणार्‍या साधनसुविधा आणि डॉक्टरांची नियुक्ती करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कृती दलाची स्थापना करण्यात आलेली आहे.