ताजमहालमध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा, तरुणास अटक

0
179

आग्रामधील ताजमहालमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची अफवा पसरवल्या प्रकरणी एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. मूळचा फिरोजाबादचा असणार्‍या या तरुणाने फोन करून ताजमहालमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला आहे अशी माहिती दिली होती. यानंतर परिसरात खळबळ माजली होती. सर्व पर्यटकांना ताजमहालमधून बाहेर काढत दरवाजे बंद करण्यात आले होते. मात्र नंतर तपासादरम्यान ही अफवा असल्याचे समोर आले. अज्ञात व्यक्तीने फोन करुन ताजमहालमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती दिल्यानंतर सीआयएसएफ जवानांनी तात्काळ तिथे उपस्थित पर्यटकांना बाहेर काढलं होत. यानंतर ज्या क्रमांकावर फोन आला त्यासंबंधी तपास केला असता ही अफवा असल्याचे समोर आले. ही अफवा पसरवणार्‍या तरुणाची ओळख पटली असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.