तरुण तेजपालप्रकरणी १२ मे रोजी निवाडा

0
73

तेहलकाचे पत्रकार तरुण तेजपाल यांच्यावरील बलात्कार प्रकरणी आरोपाच्या खटल्याचा निवाडा आता १२ मे रोजी होणार आहे. हा निवाडा काल २७ एप्रिल रोजी होणार होता. मात्र न्यायाधीश क्षमा जोशी यांनी निकाल १२ मेपर्यंत स्थगित ठेवण्यात आला असल्याचे न्यायालयात जाहीर केले. या प्रकरणातील युक्तिवाद म्हापसा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात २२ मार्च रोजी पूर्ण झाला होता. त्यानंतर न्यायालयाने दि. २७ एप्रिलला निर्णयासाठी हे प्रकरण सुनावणीसाठी ठेवले होते. फिर्यादी पक्षातर्फे सरकारी वकील फ्रान्सिस्को तावेरा तर बचाव पक्षातर्फे वकील राजीव गोम्स हे न्यायालयात बाजू मांडत आहेत. यासंबंधीची माहिती ऍड. फ्रान्सिस्को तावेरा यांनी पत्रकारांना दिली.