Home बातम्या डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणला निर्वाणीचा इशारा

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणला निर्वाणीचा इशारा

0

अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात पुकारलेल्या युद्धाला एक महिना उलटून गेला आहे, तरीही युद्धसमाप्तीची कोणतीही चिन्ह दिसत नाहीत. आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा होर्मुझबाबत मोठा इशारा दिला आहे.

अमेरिका सध्या इराणमध्येकोणताही करार झाला नाही आणि होर्मुझची सामुद्रधुनी व्यापारासाठी त्वरित खुली केली गेली नाही, तर अमेरिका अत्यंत कठोर पाऊल उचलणार असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले. करार न झाल्यास, इराणमधील सर्व वीज निर्मिती केंद्रे, तेल विहिरी आणि खर्ग बेट पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे.