डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन मुख्य आर्थिक सल्लागार

0
12

केंद्र सरकारने शुक्रवारी डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन यांची सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. गेल्या काही दिवसांपासून या संदर्भात चर्चा सुरू होती. अनंत नागेश्वरन यांचे नाव देखील चर्चेत होते. त्या संदर्भात काल दुपारी केंद्र सरकारने अधिकृत निर्णय जारी केला आहे. २०२२-२३ सालासाठीचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना केंद्र सरकारने नागेश्वरन यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे.