राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू काल गोव्यातील ‘डे ॲट सी’ कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या. आयएनएस विक्रांतवरील ‘डे ॲट सी’ दरम्यान, त्यांच्या उपस्थितीत मिग 29के उड्डाण आणि उतरवणे, युद्धनौकेतून क्षेपणास्त्र गोळीबार आणि पाणबुडी मोहिमेसह अनेक नौदल मोहिमा पार पडल्या. यावेळी त्यांना भारतीय नौदलाची भूमिका आणि कायदा तसेच मोहिमांच्या संकल्पनेबद्दल माहिती देण्यात आली. आयएनएस विक्रांतच्या खलाशांशीही त्यांनी संवाद साधला.
यावेळी राष्ट्रपतींनी नौदलाच्या सैनिकांना संबोधित केले. आपल्या राष्ट्रीय सागरी हितांचे रक्षण आणि पाठपुरावा करण्यासाठी आपले नौदलाचे सामर्थ्य अधिक मजबूत करणे आवश्यक आहे. भारतीय नौदलाची सज्जता आणि दृढ वचनबद्धतेमुळेच भारताने हिंद महासागर क्षेत्रात सुरक्षित आणि शांततापूर्ण वातावरण सुनिश्चित केले आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.