‘डी. एड.’साठी आजपासून प्रवेश अर्ज

0
26

पर्वरी येथील जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेत दि. १४ ते दि. १३ एप्रिल २०२२ पर्यंत दोन वर्षांच्या मूळ शिक्षण पदविका (डी. एड.) अभ्यासक्रम प्रवेशासाठी अर्ज आणि माहिती पुस्तिका विक्रीस उपलब्ध असेल. पूर्ण भरलेले अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख १८ एप्रिल आहे. एप्रिल २०२२ मध्ये होणार्‍या बारावीच्या परीक्षेस बसलेले विद्यार्थी अभ्यासक्रमासाठी अर्ज करू शकतात. ५० टक्के गुणांसह बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार अभ्यासक्रम प्रवेशासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. माहिती पुस्तिकेत प्रवेश प्रक्रिया, प्रवेशाची तारीख, मुलाखत आणि इतर माहिती दिलेली आहे. माहिती पुस्तिकेसाठी रु. २५० शुल्क आकारण्यात येईल.