डिफेन्स स्टडीज संस्थेला मनोहर पर्रीकर यांचे नाव

0
115

नवी दिल्लीस्थित इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडीज ऍण्ड ऍनालिसिस या संस्थेचे नाव बदलताना केंेद्राने या संस्थेचे मनोहर पर्रीकर इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स ऍण्ड ऍनालिसिस असे नामकरण केले आहे. दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांनी केंद्रात संरक्षण मंत्री असताना दिलेल्या योगदानाची दखल घेऊन वरील संस्थेला त्यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. हल्लीच मरणोत्तर पद्मभूषण हा किताब देऊन गौरवण्यात आलेल्या मनोहर पर्रीकर यांचे नाव इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडिज ऍण्ड ऍनालिसिस या संस्थेला देण्यात आल्याबद्दल केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक तसेच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आनंद व्यक्त केला आहे.

अभिमानाचा क्षण ः श्रीपाद नाईक
सर्व गोमंतकीय आणि भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) तथा संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केली आहे. इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडीज अँड ऍनालिसिस (आयडीएसए) असे नाव बदलून मनोहर पर्रीकर इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडीज अँड ऍनालिसिसाठी असे केले गेले. हा संरक्षण मंत्रालयाला दिलेल्या योगदानाचा सन्मान करण्याचा एक चांगला मार्ग असल्याचे मंत्री श्री. नाईक यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्र्याकडूनही आनंद व्यक्त
दरम्यान, इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडिज ऍण्ड ऍनालिसिस या संस्थेला मनोहर पर्रीकर यांचे जे नाव देण्यात आले आहे त्या निर्णयाचे मी स्वागत करतो. मनोहर पर्रीकर यांनी संरक्षण मंत्रिपदी असताना जे मोठे योगदान दिले होते त्या योगदानाचा हा सन्मान असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी म्हटले आहे.