मनालीहून कर्नाटकला जाणारी डिझेल मालगाडी जोलारपेटमार्गे तामिळनाडूतील तिरुवल्लूर रेल्वे स्थानकाजवळ रुळावरून घसरली. त्यानंतर तिला आग लागली. सुरुवातीला पाच बोग्यांना आग लागली. रविवारी पहाटे 5.30 वाजता ही घटना घडली. मालगाडीत 52 बोगी होत्या. जळत्या ट्रेनपासून 40 डबे वेगळे करण्यात आले आहेत. त्याच वेळी, रेल्वे स्थानकाभोवती राहणाऱ्या लोकांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. जवळपासची शहरे आणि जिल्ह्यांमधूनही अग्निशमन दलाच्या पथकांना पाचारण करण्यात आले व अखेर आग आटोक्यात आणण्यात आली.