डब्ल्यूएचओच्या कोरोना मृत्य अहवालावर भारताचा आक्षेप

0
17

जागतिक आरोग्य संघटने (डब्ल्यूएचओ)ने कोरोनामुळे भारतात झालेल्या मृत्यूंबाबत एक अहवाल जारी केला आहे. त्या अहवालानुसार, भारतात कोरोनामुळे ४७ लाखांहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे; मात्र केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार कोरोनामुळे पाच लाखांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत भारत सरकारने डब्ल्यूएचओच्या अहवालावर आक्षेप नोंदवला आहे.
डब्ल्यूएचओच्या या आकडेवारीवर भारत सरकारने प्रश्न उपस्थित केले आहेत. डब्ल्यूएचओने ज्या तंत्राने किंवा मॉडेलद्वारे ही आकडेवारी गोळा केली आहे, ती योग्य नाही. भारताच्या आक्षेपानंतरही, डब्ल्यूएचओने जुन्या पद्धतीने आणि मॉडेल्सद्वारे मृत्यूची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यात भारतातील परिस्थितीचा योग्य आढावा घेण्यात आला नसल्याचे केंद्र सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. सांगण्यात आले आहे. डब्ल्यूएचओने जाहीर केलेली आकडेवारी फक्त १७ राज्यांची आहे. ती कोणती राज्ये आहेत, हे देखील डब्ल्यूएचओने स्पष्ट केले नाही. ही आकडेवारी केव्हा जमा झाली, हे अद्याप कळलेले नाही. याशिवाय डब्ल्यूएचओने गणितीय मॉडेल्सचा वापर करून डेटा गोळा केला, यावरही भारत सरकारने आक्षेप घेतला आहे.