‘टॉप्स’ योजनेत मेरी कोमचा समावेश

0
133

सहावेळची बॉक्सिंग विश्‍वविजेती मेरी कोम, उदयोन्मुख नेमबाज यशस्विनी सिंग देसवाल व बॅडमिंटनपटू साई प्रणिथ याच्यासह एकूण १२ खेळाडूंचा टार्गेट ऑलिंपिक पोडियम स्कीम (टॉप) योजनेत समावेश करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मेरीकोम व्यतिरिक्त अमित उंगल (५२ किलो पुरुष), सोनिया चहल (५७ किलो महिला), निखत झरीन (५१ किलो महिला), कविंदर सिंग बिश्त (५७ किलो पुरुष), लवलिना बोर्गोहैन (६९ किलो महिला), विकास कृष्ण (७५ किलो पुरुष), शिवा थापा (६३ किलो पुुरुष) व मनीष कौशिक (६३ किलो पुरुष) या अन्य बॉक्सिंगपटूंचादेखील योजनेत समावेश करण्यात आला आहे.

रिओ द जानेरो येथे आयएसएस विश्‍वचषक स्पर्धेत महिलांच्या १० मीटर एअर पिस्तोल प्रकारात सुवर्ण जिंकलेली २२ वर्षीय देसवाल व जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक कांस्य जिंकलेल्या प्रणिथची कामगिरीच्या आधारे निवड भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या ‘मिशन ऑलिंपिक’ विभागाने केली आहे.