टॉन्सिल्सवर येणारे व्रण

0
47
  • डॉ. आरती दिनकर
    (होमिओ. तज्ज्ञ व समुपदेशक)

टॉन्सिल्स म्हणजेच उपजिव्हापिंडाचे व्रण. हे दोन प्रकारचे असतात- साधे व चरणारे व्रण. साध्या व्रणात पिंडातून म्हणजेच टॉन्सिल्समधून स्त्राव निघत असतो व केव्हा केव्हा त्यास फार दुर्गंधी व वाईट चव असते.

मागील भागात आपण ऑपरेशनशिवाय वाढलेले टॉन्सिल्स होमिओपॅथिक उपचारांनी कसे बरे होतात हे पाहिले. आज आपण टॉन्सिल्सवर येणार्‍या व्रणांवर होमिओपॅथिक औषधे कशी कार्य करतात हे पाहणार आहोत.

 १९ वर्षाचा यश नावाचा मुलगा माझ्याकडे घशात अन्न गिळताना खूप त्रास होतोय, तसेच वारंवार त्याला ताप येतो, ताप बरेचदा १०२ ते १०३ फॅ. पर्यंत जातो. मी त्याला तपासले तेव्हा पडजीभ व त्या बाजूचा भाग फार लाल व सुजलेला दिसला. तसेच यश सांगत होता की त्याला अन्न गिळताना घशात व कानात अत्यंत वेदना होतात. घशातील टॉन्सिल सुजलेले असल्यामुळे आणि ते फार दुखत असल्यामुळे तोंड उघडता येत नाही. त्यामुळे तो जास्तच चिडचिड करतो.. असे त्याची आई म्हणत होती. मी त्याचा घसा ज्यावेळेस तपासत होते तेव्हा माझ्या लक्षात आले की, त्याच्या श्वासाला दुर्गंधी येत होती आणि तो तसा सारखा रडत होता. मी त्याला योग्य औषधे दिली, काही पथ्ये पाळण्यास सांगितले. कारण तुम्ही जर फक्त औषधे घेतली आणि पथ्य पाळले नाही तर त्याचा तात्पुरता गुण येऊ शकतो. म्हणूनच औषधांबरोबर पथ्य पाळणे गरजेचे आहे. यशला काही दिवसातच होमिओपॅथिक औषधांनी आराम वाटला व परत कधीही त्याला टॉन्सिल्सचा त्रास उद्भवला नाही .

प्रथमतः टॉन्सिल्सवर येणारे व्रण – ह्यात टॉन्सिलवर व त्याचबरोबर ओठ, चेहरा, मान, जननेंद्रिये व त्वचा यावर पांढरे लहान -लहान व्रण येतात. पडजीभ व त्या बाजूचा भाग फार लाल व सुजलेला दिसतो. फार दुखत असल्यामुळे तोंड उघडता येत नाही. गिळताना घशात व कानात वेदना होतात. ताप येतो. ताप बरेचदा १०३ -१०४ फॅ .पर्यंत जातो. श्वासाला दुर्गंधी असते. श्वासोच्छ्‌वासास फार त्रास होतो. टॉन्सिल्सवरील व्रण फुटल्यावर त्यांच्या मध्यभागी काळा डाग दिसतो.

टॉन्सिल्स म्हणजेच उपजिव्हापिंडाचे व्रण
दोन प्रकारचे असतात- साधे व चरणारे व्रण. साध्या व्रणात पिंडातून म्हणजेच टॉन्सिल्समधून स्त्राव निघत असतो व केव्हा केव्हा त्यास फार दुर्गंधी व वाईट चव असते. चरणारे व्रण होण्यापूर्वी पेशंटला फार अशक्तपणा जाणवतो. अस्वस्थता वाटते व थोडासा ताप असतो. टॉन्सिल्समध्ये काहीतरी होत आहे असे वाटते नंतर टॉन्सिल्सवर काळा डाग पडतो, श्वासास दुर्गंधी येते, अशक्तपणा वाढतो. मुर्च्छा येते. शरीर थंड पडते. नाडी फार जलद होते. श्वास फार कष्टदायक होतो. परंतु योग्य होमिओपॅथिक औषधांनी रोगी बरा होतो तेव्हा टॉन्सिल्सवरील काळे डाग निघून जातात व हळूहळू औषधांनी शक्ती येऊन रोगी काही दिवसांनी बरा होतो.