टीम इंडियाच्या जर्सीवर दिसणार ‘एमपीएल’ लोगो

0
235

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) काल मंगळवारी मोबाइल प्रीमियर ‘एमपीएल’ या ऑनलाईन गेमिंग ऍपशी टीम इंडियाचा अधिकृत ‘किट’ प्रायोजक म्हणून तीन वर्षांच्या कालावधीसाठी करार केला आहे. तशी अधिकृत घोषणा काल बीसीसीआयने केली आहे.
यापूर्वी ‘नायकी’कडे हे अधिकार होते. नायकीचा करार पाच वर्षांचा होता.

२०१५मध्ये त्यांनी बीसीसीआयकडे करार केला होता, तो या वर्षी संपुष्टात आला. त्यानंतर त्यांनी आपला करार वाढवण्यात रस न दाखवल्याने भारतीय संघाने नवीन प्रायोजकत्वासाठी लिलाव ठेवला होता. त्यात एमपीएलने बाजी मारली. त्यानुसार एमपीएल पुढील तीन वर्षांसाठी प्रत्येक सामन्यामागे बीसीसीआयला ६५ लाख रुपये देतील. त्यांच्या जागी आता नोव्हेंबर २०२० ते डिसेंबर २०२३पर्यंत टीम इंडिया, बीसीसीआय आणि एमपीएल यांच्यात झालेल्या या करारानुसार आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेपासून टीम इंडियाच्या जर्सीवर एमपीएलचा नवा लोगो दिसेल. भारतीय क्रिकेट पुरुष संघा व्यतिरिक्तमहिला संघ आणि अंडर-१९ संघाच्या जर्सीवर ‘एमपीएल’चा लोगो दिसणार आहे.

भारतीय क्रिकेट टीममध्ये एक मोठी घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे की, भारतीय क्रिकेट टीमच्या (पुरुष आणि महिला) अधिकृत कीटचे प्रायोजक २०२३ पर्यंत एमपीएल असणार आहे. एमपीएल स्पोर्टस् टीम इंडियाच्या कीटमध्ये एक नवे पर्व ठरेल. त्याचप्रमाणे बीसीसीआयचे परवानाकृत साहित्य जगभरातील करोडो टीम इंडियाच्या चाहत्यांना सहजरित्या पुरवण्याचे काम करेल, अशी माहिती बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर दिली आहे.