ज्येष्ठ गायक शरद जांभेकर यांचे निधन

0
167

ज्येष्ठ शास्त्रीय गायक शरद जांभेकर यांचे काल लिलावती रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. ताप आणि अशक्तपणा जाणवू लागल्याने त्यांना लिलावतीत दाखल करण्यात आले होते. अनेक संगीत नाटकांत त्यांनी काम केले. त्यांचे संगीत ‘सौभद्र’ नाटकातील राधाधर मधु मिलिंद हे नाट्यगीत विशेष गाजले. ते मुंबई आकाशवाणी केंद्रात दीर्घकाळ प्रोड्युसर म्हणून कार्यरत होते.