जे. पी. नड्डा यांचा गोवा दौरा रद्द

0
94

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आज सोमवारपासून सुरू होणारा दोन दिवसांचा गोवा दौरा रद्द झाला आहे. श्री. नड्डा यांचे आज सोमवारी गोव्यात आगमन होणार होते व त्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. मात्र, त्यांच्या नवी दिल्लीतील व्यस्त कार्यक्रमांमुळे त्यांचा गोवा दौरा रद्द करण्यात आला असल्याची माहिती भाजपचे गोवा अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी काल दिली. गोवा विधानसभेची निवडणूक आठ महिन्यांवर येऊन ठेपल्याच्या पार्श्‍वभूमीवर जे. पी. नड्डा यांच्या या दौर्‍याचे आयोजन करण्यात आले होते. नड्डा हे आज गोव्यात आल्यानंतर आपल्या दोन दिवसांच्या दौर्‍यात राज्याचे मुख्यमंत्री व अन्य मंत्रीगण, भाजप आमदार तसेच राज्यातील भाजपच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेऊन पुढील निवडणुकीसाठी त्यांना मार्गदर्शन करणार होते.