जेरेमीने मोडले तीन विक्रम

0
96

भारताचा युवा वेटलिफ्टर तथा यूथ ऑलिंपिकमधील सुवर्णपदक विजेत्या जेरेमी लालनिरुंगा यांने काल दमदार कामगिरी करताना अपिया, सामोओ येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये स्नॅच प्रकारात तीन विक्रम मोडित काढले. क्लीन आणि जर्क लिफ्टमध्ये मात्र त्याला अपयशी ठरले.

१६ वर्षीय जेरेमीने संस्मरणीय कामगिरी करताना ६७ किलो विभागात १३६ किलो वजन उचलताना जागतिक यूवा, आशियाई आणि राष्ट्रकूल स्पर्धा विक्रम मोडित काढले. यापूर्वी जागतिक युवा आणि आशियाई विक्रम हे जेरेमीच्याच नावे होते. जे त्याने एप्रिलमध्ये निंगबो, चीन येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत १३४ किलो वजन उचलून नोंदविले होते. परंतु जेरेमीला क्लिन अँड जर्कमध्ये मात्र अपयश आले.
अन्य भारतीय वेटफ्टिर्सनीही स्पर्धेत शानदार कामगिरी करताना चार सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्यपदक पटकाविले. अचिंता शेउलीने एकूण ३०५ (१३६+१६९) किलो वजन उचलत पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकाविले. महिलांच्या ७६ किलो वजनी गटात मनप्रीत कौरने २०७ (९१+११६)