जीसीईटी परीक्षा २७ जुलैपासून

0
75

अभियांत्रिकी आणि फार्मासी महाविद्यालयाच्या प्रवेशासाठीची गोवा सामायिक प्रवेश परीक्षा (जीसीईटी) पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. १५ आणि १६ जून रोजी होऊ घातलेली परीक्षा आता २७ आणि २८ जुलै रोजी घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. जीसीईटी परीक्षेबाबतच्या निश्‍चित तारखा दहा दिवस अगोदर जाहीर करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर लक्ष ठेवावे, असेही तांत्रिक शिक्षण संचालनालयाने कळवले आहे.