जीएसटी संकलन मे महिन्यात घटले

0
18

मे महिन्यातील जीएसटी संकलनाचे आकडे समोर आले असून, मागील दोन महिन्यांच्या तुलनेत मे महिन्यात जीएसटी संकलनात मोठी घट झाली आहे.

अर्थ मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मे महिन्यात एकूण जीएसटी महसूल संकलन १,४०,८८५ कोटी रुपये एवढे झाले. मात्र गेल्या दोन महिन्यांतील जीएसटी संकलनापेक्षा हा आकडा कमी आहे. एप्रिलमध्ये जीएसटी संकलन १.६८ लाख कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर होते. त्याआधी, मार्चमध्ये जीएसटी संकलन १.४२ लाख कोटी रुपये होते.

मे महिन्यातील जीएसटी संकलन मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ४४ टक्क्यांनी वाढून सुमारे १.४१ लाख कोटी रुपये झाले आहे. मार्चपासून सलग तिसर्‍या महिन्यात जीएसटी संकलन १.४० लाख कोटींच्या पुढे गेले आहे.