जिल्हा पंचायत निवडणुकीचा जाहीर प्रचार आज थांबणार

0
126

दि. १८ रोजी होणार्‍या जिल्हा पंचायत निवडणुकीचा जाहीर प्रचार आज बंद होणार असून निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे.
सध्या निवडणूक प्रचार जोरात सुरू आहे. मगो, भाजप व अपक्ष यांची युतीच निवडणुकीत विजयी होईल, असा विश्वास युतीचे नेते व्यक्त करीत आहेत. मगोला या निवडणुकीसाठी भाजपने ९ जागा सोडल्या आहेत. परंतु काही भागात भाजपचे कार्यकर्ते मगो उमेदवारांच्या प्रचारात सक्रियपणे सहभागी होत नसल्याने मगो कार्यकर्ते नाराजी व्यक्त करीत आहेत. प्रत्येक उमेदवाराने घरोनघर प्रचारावरच अधिक भर दिला आहे.भाजप उमेदवारांना निवडून आणण्यासाठी केंद्रीय संरक्षणमंत्री प्रचारकार्यात सामील झाले आहेत. परवा काणकोण भागात त्यांनी दौरा केला होता.