‘जादूगार’ मेजर ध्यानचंद

0
263

प्रा. नागेश सु. सरदेसाई

दर वर्षी २९ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. हॉकी खेळाचे जादूगर म्हणून ओळखले जाणारे मेजर ध्यानचंद यांचा तो जन्मदिवस. आजच्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्ताने सर्व आजी-माजी खेळाडूंना त्यांच्या कठोर परिश्रमांबद्दल शत शत प्रणाम आणि शुभेच्छा!

दर वर्षी २९ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. हॉकी खेळाचे जादूगर म्हणून ओळखले जाणारे मेजर ध्यानचंद यांचा तो जन्मदिवस. ऑलिम्पिकमध्ये हॉकीला त्यांनी १९२८, १९३२ आणि १९३६ असे सलग तीन वेळा सुवर्ण पदक मिळवून दिलं आहे. तसेच १९२६ ते १९४८ अशी तब्बल २२ वर्षे त्यांनी हॉकीमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. १९३६ साली बर्लिन-जर्मनी येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये तेव्हाचे जर्मन शासक ऍडोल्फ हिटलर यांनी मेजर ध्यानचंदच्या खेळावर संतुष्ट होऊन त्यांना जर्मन नागरिकत्व बहाल करण्यास ते उत्सुक होते. तसेच हिटलरने त्यांच्या हॉकी स्टिकचे बारकाईने निरीक्षण केले होते, असेही सांगितले जाते. त्यांच्या स्मरणार्थ दर वर्षी २९ ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो.
ध्यानचंद यांचे नाव दिल्लीतल्या राष्ट्रीय मैदानाला देण्यात आलेले आहे. यांचे प्रशिक्षक पंकज गुप्ता हे होते.

मेजर ध्यानचंद यांचा जन्म १९०५ सालचा. त्यांनी आपल्या ७४ वर्षांच्या आयुष्यात भारतातील हॉकीचे स्थान उंचावण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. त्यांनी ब्रिटीश फौजेत, तसेच स्वातंत्र्यानंतर भारतीय फौजेत काम केले. १९२२ साली ते रुजू झाले आणि ३४ वर्षे त्यांनी पंजाब रेजिमेंटद्वारे फौज सेवा दिली. १८५ स्पर्धांमध्ये खेळ खेळून एकूण ५७० गोल केलेत. १९२८ मध्ये ऍमस्टर्डम (हॉलँड), १९३२ मध्ये लॉस अँजेलीस (अमेरिका) आणि १९३६ मध्ये बर्लिन (जर्मनी) येथील ऑलिम्पिकमध्ये त्यांनी सुवर्णपदकांची हॅट्‌ट्रीक घडवून आणली. जागतिक महायुद्ध (१९३९-१९४५) झाले असता ऑलिम्पिक खेळ न झाल्यामुळे त्यांच्या सुवर्ण पदकांमध्ये जास्त भर पडू शकली नाही.

भारत सरकारने त्यांना देशाचा तिसरा नागरी सर्वोच्च पुरस्कार- भारत पद्मभूषण १९५६ साली बहाल केला. ग्वालियरमधून शिक्षण घेऊन त्यांनी हॉकी खेळात रुची दाखवली. रात्री हॉकी खेळाचा सराव करायचा आणि दिवसाला काम करायचं. १९२८ साली हॉलंड देशाला त्यांच्याच मैदानावर मात देत (३-०) सुवर्ण पदक मिळवून दिले. त्या ऑलिम्पिकमध्ये १४ गोल करून ते अव्वल ठरले. १९३२ मध्ये लॉस अंजिलिस (अमेरिका) त्यांनी अमेरिकी हॉकी संघाला (२४-१) अशी मात दिली. तो त्यावेळी एक विक्रम होता. १९ ऑगस्ट १९३६ रोजी बर्लिन ऑलिम्पिकमध्ये भारताने जर्मनीचा (८-१) असा पराभव करून सुवर्णपदक मिळवण्यात ते यशस्वी झाले. ३ गोल करून पुन्हा एकदा सर्वांत जास्त गोल करण्याचा मान त्यांनी मिळवला. १९६६मध्ये त्यांनी खेळातून निवृत्ती घेतली. राजस्थानातील माऊंट अबू येथे त्यांनी प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली. त्यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून राष्ट्रीय खेळ प्राधिकरणात पटियाला येथे पाठवण्यात आले. त्यांनी आपले संपूर्ण जीवन हॉकी या खेळासाठी समर्पित केले. ३ डिसेंबर १९७९ रोजी त्यांना देवाज्ञा झाली. झांसी येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. १९८० साली भारत सरकारने त्यांच्या स्मरणार्थ एक पोस्टाचे तिकीट काढून त्यांना गौरवान्वित केले. २०१२ साली त्यांना मरणोपरांत राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. त्यांचे सुपुत्र अशोकचंद यांनी तो स्वीकारला.

१९८० नंतर भारताला हॉकीमध्ये पदक मिळविता आले नाही. आजच्या आपल्या क्रीडा क्षेत्रावरून एक नजर फिरविली तर आपल्याला असे दिसून येते की १३० करोड लोकसंख्येच्या या देशात फक्त १ सुवर्णपदक अभिनव बिंद्रा याला प्राप्त आहे. ही परिस्थिती आता बदलली पाहिजे. फक्त क्रिकेटच्या खेळाला आपली पसंती दर्शवून आम्ही इतर खेळांकडे दुर्लक्ष केले. पण आता परिस्थिती बदलते आहे. बॅडमिंटन, टेबल टेनिस इ. खेळाकरिता भारत प्रयत्नशील आहे.

पुरस्कारांचा जर विचार केला तर आपल्या देशात खेळाडूंसाठी राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार सर्वश्रेष्ठ पुरस्कार असून यावर्षी क्रिकेटर रोहीत शर्मा, हॉकीपटू रानी रामपाल, टेबल टेनिस खेळाडू मोनिका बत्रा, मल्ल विनिश फोगाट तसेच दिव्यांग खेळाडू तंगवेल्लु मरियाप्पन यांना घोषित झालेला आहे. त्याशिवाय वेगवेगळ्या खेळांसाठीचे २७ अर्जुन पुरस्कार जाहीर झालेले असून त्याशिवाय प्रशिक्षणपदासाठी मेजर ज्ञानचंद, तसेच द्रोणाचार्य पुरस्कारही आहे. विद्यापीठ स्तरावर सर्वांत अव्वल विद्यापीठाला पुरस्काराने् सन्मानित केलेे जाते. फिट् इंडिया तसेच खेलो इंडिया यांसारखे नवीन उपक्रम घेऊन क्रीडा मंत्रालय पुढे येण्याचा प्रयत्न करीत आहे. क्रीडा मंत्री तसेच प्रधान मंत्र्यांनी खेळांना समर्पित मणिपूर विश्‍वविद्यालय स्थापन करून व खेळांना वाढीव मदत देऊन पावले उचललेली आहेतच. तसेच विदेशी प्रशिक्षक आणून खेळांचा दर्जा वाढविणे ही काळाची गरज आहे.

आज भारत खेळांच्या संदर्भात प्रयत्नशील आहे. येत्या १० वर्षांत ऑलिम्पिकमध्ये १० सुवर्णपदक मिळविणे हा ध्यास घेऊन त्या दिशेने प्रयत्न चालू आहेत. आजच्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्ताने सर्व आजी-माजी खेळाडूंना त्यांच्या कठोर परिश्रमांबद्दल शत शत प्रणाम आणि शुभेच्छा!