जहाजातील नाफ्ता काढण्यासाठी ‘त्या’ कंपनीला आदेश : मुख्यमंत्री

0
125

दोनापावल येथे समुद्रात रुतलेल्या नलिनी नाफ्तावाहू जहाजातील नाफ्ता काढण्याचा कामाचा आदेश हॉलण्ड येथील मास्टर मरिना या कंपनीला काल देण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली. मास्टर मरिना कंपनीला येत्या ३० दिवसात नाफ्ता बाहेर काढून रुतलेले जहाज बाहेर काढण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्यात अरबी समुद्रातील वादळामुळे मुरगाव बंदरात नांगरून ठेवलेले नाफ्तावाहू जहाज भरकटत दोनापावल येथे येऊन रुतले आहे.
राज्य सरकारकडून नाफ्ता काढण्याच्या कामावर खर्च केला जाणार नाही. डीजी शिपिंगतर्फे जहाजातील नाफ्ता काढण्याच्या कामावर खर्च केला जाणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.