जळणारं मन आणि विचारांची राख!

0
426

– लाडोजी परब

जिंकल्यानंतर प्रतिस्पर्ध्याला कमी लेखणारे भरपूर असतात. पण हरलेल्या क्षणी पाठीशी उभे राहणारे किती असतात? यावरूनच माणसाची श्रीमंती कळते. तुम्ही किती जणांच्या पाठीशी आहात, हे महत्त्वाचं आहे. दुसर्‍याला कमी लेखून, थट्टा करून, निंदा नालस्ती करून तुम्ही स्वत:चं महत्त्व कमी करून घेता, हे मात्र विसरू नका. 

स्वभावाला औषध नसते असं म्हणतात! खरंच आहे ते. दुसर्‍याचं जरा जरी चांगलं झालं तरी मनातून जळणे हा प्रकार सर्रास पाहावयास मिळतो. जळणे, तिरस्कार करणे, मनात राग धरणे, चेष्टा करणे, विडंबन, उपहास या मानवी मनाच्या काही विकृती आहेत. पाठीमागून निंदा करणार्‍यांची ती एकप्रकारे स्तुतीच असते. वाईट गोष्टीला कुणी पटकन विरोध करत नाही. चांगल्या गोष्टीसाठी ढीगभर मांजरे समोर उभी! त्याला त्याच्या चुका कळतात, सुधारण्यासाठी तो आणखी झेप घेतो. मग ती निंदा कुठल्याही प्रकारची असो. डोळ्यांत, ओठांवर, नाकावर त्याचे हावभाव दिसतात. म्हणूनच म्हटलंय ना, निंदकाचे घर असावे शेजारी! चांगल्या कामात नेहमी मांजरं आडवी जातात, म्हणून काय तो अपशकून समजून स्वत:च्या कार्यापासून परावृत्त व्हायचे?
गोव्यात माडाला गवत संबोधले जावे, अशा विधेयकाची चर्चा जोरात सुरू झाली आणि त्यावर टीका करणार्‍यांची रीघच लागली. विषय न कळणारेही विरोध करायचे. एका महाभागाने तर ‘आता सुपारीक गवत म्हनपाक जाय’ असा आग्रह धरला. ‘किदे सांगता रे तू, मायबाप सरकार आपल्याक जाय तसो कायदो बदलयता!’ आणि त्यानंतर विषय चघळायला सांगायला नको. विरोधकांना कुरण मिळाले. चरण्याची सोय झाली. कुरण संपल्यावर हा विषय संपला. त्यात माडाच्या विषयावरून बहुतेक जण खाली आले. काही जण शेंड्यावरच आहेत.
‘लोकां सांगे ब्रह्मज्ञान स्वत: कोरडे पाषाण’ अशी माणसं खूप असतात. फुकटचे सल्ले देणार, स्वत:त काही करण्याची धमक नसणार तरीही दुसर्‍याला कमी लेखून स्वत:च्या मनाला समाधान मिळवून देणारे लोक निंदा नालस्तीचे स्वत:च बळी ठरतात. कुटुंबात कलह असतातच. तसा परिस्थितीचा चढ-उतारही असतो. सासू-सुनेवर जळते. सुनेनं नवीन दागिना घेतला तर ‘काय मस्त आसा गो’ म्हणणार, की समजायचे, सासू मनातून जळतेय. एका तत्त्ववेत्त्याने एका भाषणात सांगितलं होतं- जळणार्‍याला जळू द्यावे, स्वत:चे काम कधीच थांबवू नये. पुढे चालावे, जळणारा स्वत:च जळून खाक होतो. कारण तो त्याच विचारात असतो. त्याचे विचार त्याला मानसिक, व्यक्तिमत्त्व विकास करण्यास साथ देत नाहीत. हा एक विकार आहे आणि तो दुसरा कुणी संपवू शकत नाही.
तोंडावर एक आणि पाठीमागून एक असे काही जण असतात. तिसवाडी तालुक्यात एका कार्यक्रमासाठी मी गेलो होतो. तिथे मुलांचे वार्षिक क्रीडा संमेलन भरलेले. या कार्यक्रमात एका राजकारणातील महनीय व्यक्तीला पाचारण केलेलं. मुले हातात झेंडा, फलक घेऊन उन्हात तासनतास् उभी होती. तास संपला, दीड तास झाला. हे महाशय काही केल्या येईनात. शिक्षकांत कुजबुज सुरू होती. ‘ह्‌यो कोन स्वत:क होल्डो समाजता, पुढच्या येळेक हेका आपोवपाचो नाय,’ तोपर्यंत चार मुले चक्कर येऊन पडली. दोन तासांनी लाल दिव्याची गाडी लागली. ‘पात्रांव यो यो….’ उगारणारे हात जोडले गेले. मग काय, भाषणबाजी सुरू….ही पाठीमागून होणारी निंदा काय कामाची? आल्याबरोबर जर त्याला जाब विचारला तर दुसर्‍यावेळी तो तसं करणार नाही!
एखाद्याने नवीन वस्तू खरेदी केली, कुणाला यश मिळाले, आपल्याला नाही, पण दुसर्‍याला ती संधी मिळतेय, दुसर्‍याची जास्त प्रसिद्धी होते तेव्हा मनाची जळजळ होते. पण जळणारा स्वत:च जळत असतो. शेवटी काय, आयुष्यभर कोरडे पाषाणच! जळणे हा प्रकार अहंकाराशी जोडला गेला आहे.
तुकल्यान पंचवीस लाखांचो बंगलो बांधल्यान. ता बाबल्याच्या मनात खुपत होता. कोणाची दृष्ट लागा नये म्हणान एक बावला बंगल्याच्या बाहेर तुकल्यान उभ्या केल्यान. तुकल्याच्या समोरच बाबल्याचा पडक्या घर. आता बाबल्यान काय करूचा? पयला ता बावला पळयल्यान. रात्री बारा नंतर खिडक्यांवर सखारडो मारल्यान, तुकल्याच्या घरची जाम घाबरली. दुसर्‍या दिवशी गुरवाकडे गेली. गुरवान देव उभो केल्यान घडयेर. त्या आधी बाबल्यान गुरवाक पाचशे रुपये दिवन सगळा फिट केलेल्यान. गुरवाचो देव सांगाक लागलो ‘तुझ्या मठयेत स्थिरता नाय, ती मठी तुका सोडूची लागतली. नायतर भयंकर प्रसंग तुमच्या कुटुंबार येतले. थय हानीचो देवचार आसा…’ तुकल्यान घरासकट बंगलो विकूक काढल्यान. गोव्याचा एक गिर्‍हाईक इला. बंगलो २० लाखाकच दिल्यान आनी आता तो गावाच्या सीमेर जागा घेवन रावता. झाला, बाबल्याचो प्लॅन एकदम परफेक्ट लागलो. बाबल्याक समाधान मेळला. आपण मात्र आयुष्यभर भिकारडो!
एवढेच काय, एखाद्या सुंदर बाईवर एखादी विद्रूप बाई जळत असते. कारण असतं तिचं सौंदर्य! कलेच्या बाबतीतही तीच स्थिती, एखाद्या चांगल्या कलाकाराला आपल्यापेक्षा वरचढ कुणी होऊ नये, असं सतत वाटतं. काहींना तर शिष्यांचीच भीती वाटते. काही वेळा तिरस्कार आणि निंदा यांची दोस्तीच असते. आता हेच पहा, एक जोडपं, टी.व्ही.वर सिनेमा पाहत होतं. नवरा जवळ येऊन बायकोला म्हणतो, ‘शोनू खूप बोअर झालंय मी टी.व्ही. बघून. चल भायर खय तरी फिराक जावया.’ बायको म्हणते, ‘होय, तेवढीच तुका संधी, घरात असल्यात काय रावणासारखे वागतात. भायर गेल्यात काय रामाचो अवतार घेतात’. ‘अगो, रावणान सीतेक पळवल्यान तेची उपमा माका काय दितय?’ त्यावर बायको म्हणते, ‘जळला मेला लक्षण ता, रावणाक दहा तोंडा होती, पण लक्ष एका सीतेवरच होता. तुमका एक तोंड आसान दहा जणार अजून लायन मारतात. रावणाचो आदर्श घेया जरा….’आता काय बोलणार? म्हणून जरा जपून! अर्धांगिनीला अर्धीच माहिती द्या, सुखी व्हाल, नाहीतर जळफळाट सुरू. आपल्यासाठी चांगला वेळ आयुष्यात नक्की येतो, पण तो वेळेवर येत नाही. त्यामुळे दुसर्‍यांची निंदा नालस्ती करण्यापेक्षा स्वत:ला सिद्ध करण्याची तयारी ठेवा. कागाळ्या करणे हा सुद्धा एक निंदेचाच प्रकार! एखाद्या आस्थापनात बॉसला कागाळ्या सांगणारी