जम्मू-काश्मीरात काल पाच दहशतवादी ठार

0
153

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी काल रविवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईत एकूण ५ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. यात सुरक्षा दलाचे दोन जवानही जखमी झाले आहेत.

जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यांत सुरक्षा दलांची दहशतवाद्यांविरोधात रात्रभर कारवाई सुरू होती. शनिवारी एक दहशतवादी ठार झाला होता. दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात हादीपुरामध्ये सुरक्षा दलांचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. यात ३ दहशतवादी ठार झाले. तसेच काल हादीपुरामधील कारवाईत आणखी दोन दहशतवादी ठार झाले. ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एक अलिकडेच संघटनेट सामील झाला होता. सुरक्षा दलांनी त्याला शरण येण्याचे आवाहनही केले होते. त्याला शरण यायचे होते, पण त्याच्या साथीदाराने त्याला अडवल्याची माहिती पोलिसांनी दिली. हादीपुरामध्ये दहशतवादी अजून असून या भागात अजूनही शोध मोहीम सुरू आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये काश्मीरमध्ये वेगवेगळ्या चकमकीत १२ दहशतवादी ठार झाले आहेत.