जम्मू-काश्मीरातील ग्रेनेड हल्ल्यात १२ जण जखमी

0
265

जम्मू आणि काश्मीरमधील काकापोरममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात १२ नागरिक जखमी झाले आहेत.

केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) व पोलिसांच्या संयुक्त पथकावर दहशतवाद्यांनी हे ग्रेनेड फेकले होते. मात्र त्यांचा निशाणा चुकला व ग्रेनेडचा रस्त्यावरच स्फोट झाला. या हल्ल्यात १२ नागरिक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्याच रुग्णालयात दाखल करून तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.

दरम्यान, काश्मीर खोर्‍यात सीमेपलीकडून पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच असून काल बुधवारी पाकिस्तानने पुंछ जिल्ह्यात दोन ठिकाणी गोळीबार केला. गेल्याच आठवड्यात पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात बारताचे पाच जवान हुतात्मा झाले होते. त्याला जोरदार प्रत्युत्तर देत भारताने पाकचे ११ सैनिक यमसदनास पाठवले होते.
दरम्यान, गेल्या सोमवारी दहशतवाद्यांनी कुलगाम जिल्ह्यातील पोलीस चौकीवर ग्रेनेड हल्ला केला होता. त्यावेळी ग्रेनेडचा नेम चुकला होता व त्यामुळे त्यात कोणीही जखमी झाले नव्हते.