जम्मू-काश्मीरमध्ये दोन जवान शहीद

0
7

>> शोधमोहीम सुरू, दहशतवाद्यांचे मार्ग सील

शनिवारी रात्री उशिरा दहशतवाद्यांशी सुरू झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले असून तीन जवान जखमी झाले आहेत. या चकमकीत काही दहशदवादीही मारले गेल्याचे वृत्त आहे.

जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद संपवण्यासाठी सुरक्षा दल दहशतवादी आणि त्यांचे समर्थक, तसेच त्यांना आश्रय देणाऱ्यांना लक्ष्य करत आहेत. जवान आपल्या याच मिशनवर असताना हा प्रकार घडला. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दहशतवाद्यांचे पळून जाण्याचे मार्ग सील करण्यात आले आहेत.
अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनागमधील अहलान भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक उडाली. पोलीस आणि सुरक्षा दलाच्या पथकाने एका विशिष्ट इनपुटनंतर अहलानमध्ये घेराबंदी आणि शोधमोहीम सुरू केली. या दरम्यान लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. यानंतर चकमक सुरू झाली. कालही चकमक व शोधमोहीम सुरू होती. गुप्त माहितीच्या आधारे अनंतनाग जिल्ह्यातील कोकेरनाग भागात भारतीय लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) यांनी संयुक्त मोहीम सुरू केली आहे.

या दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे व दारू गोळा आहे. तसेच हे दहशतवादी जैश-ए-मोहम्मद संघटनेशी संबंधित आहेत. सुरक्षा दलांनी या संपूर्ण परिसराचा घेराव घातला आहे, त्यामुळे दहशतवाद्यांना पळून जाण्याचा मार्ग नाही.

दहशतवादी हल्ल्यांना जोरदार प्रत्त्युत्तर

जम्मू-काश्मीरच्या विविध भागांत दहशतवाद्यांकडून गेल्या 78 दिवसांत 11 हल्ले केले आहेत. दहशतवादी सुरक्षा दलासोबतच सामान्य नागरिकांनाही लक्ष्य करत आहेत. मात्र भारतीय लष्कर व सुरक्षा जवान त्यांना त्याचप्राणे तीव्र प्रत्युत्तर देत असून प्रतिहल्ले करत आहेत. दहशतवादी सीमेपलीकडून सातत्याने घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. पीओकेच्या अनेक भागात दहशतवादी सक्रिय आहेत. आयएसआय या दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी मदत करत आहे.