जम्मू काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा

0
18

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी गेल्या २४ तासात ३ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. कुलगाम भागात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा तसेच आक्षेपार्ह साहित्यही जप्त करण्यात आले आहे.