जगभरातील उद्योजकांनी भारतात गुंतवणूक करावी ः पंतप्रधान

0
118

येथे आयोजित ग्लोबल बिझनेस फोरमच्या व्यासपीठावरून बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल भारत कशा पद्धतीने प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे याकडे उपस्थितांचे लक्ष वेधले. डेमॉक्रॅसी, डेमॉग्रॅफी, डिमांड व डिसिजिव्हनेस अशा मुद्द्यांचा उल्लेख मोदी यांनी यावेळी केला. जगभरातल्या उद्योजकांनी भारतात गुंतवणूक करावी असे आवाहन यावेळी मोदी यांनी केले.

भारतात आम्ही लोकशाही, लोकांच्या अपेक्षा, मागणी आणि सरकारची निर्णय क्षमता हे मुद्दे विचारात घेऊन प्रगतीची गती वाढविला आहे असे मोदी यांनी स्पष्ट केले. आम्ही कंपनी कर कपातीचा ऐतिहासिक निर्णय घेतला. सगळेच व्यापारी नेते या निर्णयाला ऐतिहासिक निर्णय असे मानतात. गुंतवणूक वाढावी यासाठी आम्ही महत्त्वाचे निर्णय घेतले. दुसर्‍यांदा सत्तेवर आल्यानंतर आम्ही व्यापार्‍याला अडथळा ठरणारे ५० पेक्षा अधिक कायदे रद्द केले. याकडे त्यांनी लक्ष वेधले. भारताबरोबर व्यापारी करार करणे ही जगभरातील गुंतवणूकदारांना एक सुवर्णसंधी ठरेल असेही मोदी यांनी सांगितले.