छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ६ जवान शहीद

0
97

नक्षलवाद्यांनी छत्तीसगडच्या दंतेवाडा येथे घडवून आणलेल्या आयडीच्या शक्तीशाली स्फोटात ६ जवान शहीद तर एक गंभीर जखमी झाला आहे. जवानांच्या वाहनाला लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. छत्तीसगड राज्याच्या सशस्त्र दलाच्या ४ व जिल्हा दलातील २ जवानांचा शहीदांमध्ये समावेश आहे. दंतेवाडाच्या छोलनार या गावात हा घातपात घडवून आणण्यात आला. अत्यंत शक्तीशाली स्पोटकांचा वापर या हल्ल्यासाठी करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ७ पैकी ५ जवान जागीच मृत्यूमुखी पडले.
याआधी गेल्या १३ मार्च रोजी नक्षल्यांनी सुकमा जिल्ह्यातील सुरक्षा दलांच्या एका शोध मोहिमेवेळी असाच आयईडी स्फोट घडवून आणला होता व त्यात तब्बल १३ जवान शहीद झाले होते.