देशात कोरोनाच्या रुग्णसंख्या प्रचंड वेगाने वाढू लागली असून गेल्या २४ तासांत देशात १ लाख ५९ हजार ६३२ इतके नवीन रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी दर हा वाढून १० टक्क्यांवर गेला आहे. देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १,५९,६३२ नवीन रुग्ण आढळले असून ३२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
देशात सध्या ५ लाख ९० हजार ६११ सक्रिय रुग्ण आहेत. देशातील कोरोना रुग्ण वाढीचा दर हा १०.२१ टक्क्यांवर पोहोचला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्याही वाढत असून सध्या देशातील २७ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. देशातील ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या ही ३,६२३ इतकी झाली आहे. त्यापैकी १४०९ जण बरे झाले आहेत.