चोवीस तासांत कोरोनामुळे राज्यात ५ मृत्यू, ९० बाधित

0
25

राज्यात गेल्या चोवीस तासांत कोरोनामुळे तब्बल पाच रुग्णांचा मृत्यू झाला असून नवे ९० रुग्ण सापडले. तसेच गेल्या चोवीस तासांत ११४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील सध्या सक्रीय कोविड रुग्णांची संख्या ८३३ झाली असून राज्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ३३०८ एवढी आहे. काल राज्यात गेल्या चोवीस तासांत ५१३९ स्वॅब चाचण्या करण्यात आल्या. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६५ टक्के झाले आहे. तर कोरोना पॉझिटिव्हिटी दर १.७५ टक्के एवढा आहे. गेल्या २४ तासांत इस्पितळांतून डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या ७ एवढी आहे. तर गेल्या २४ तासांत इस्पितळांत भरती करण्यात आलेल्या रुग्णांची संख्या १६ एवढी आहे. तसेच ७४ जण गृहविलगीकरणात राहिले आहेत.

मडगावात सर्वाधिक रुग्ण
या घडीला राज्यात सर्वात जास्त रुग्ण मडगाव मडगावात असून ती संख्या १२९ एवढी आहे. त्या खालोखाल पणजीत ५३, कांदोळी ५२, फोंडा ४५ अशी रुग्णसंख्या आहे. राज्यात सध्या कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १,७२,०९४ एवढी तर एकूण रुग्णसंख्या १,७६,२३५ एवढी झाली आहे. आतापर्यंत घरी विलगीकरणात राहिलेल्यांची संख्या १,२३,२३३ एवढी असून इस्पितळात आतापर्यंत भरती झालेल्यांची संख्या २९,४८३ एवढी आहे.