चोवीस तासांत कोरोनाने २ मृत्यू, १८३ बाधित

0
106

राज्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण आता घटू लागले आहे. काल शुक्रवारी कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला. तर बर्‍याच काळानंतर नव्याने संसर्ग होणार्‍यांचे प्रमाणही २००च्या खाली आले असून काल १८३ नवे रुग्ण आढळले. राज्यात ह्या महामारीमुळे मृत्यृमुखी पडलेल्यांची संख्या ३०६२ एवढी झाली आहे. तर त्यामुळे सध्या राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या २१६४ एवढी खाली आली आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १,६७,१०३ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्र’ाण ९६.८७ टक्क्यांवर पोहोचले आहे.

चोवीस तासांत २८५ कोरोनामुक्त
गेल्या चोवीस तासांत राज्यात २८५ जण बरे झाले आहेत. तर इस्पितळांतून काल २९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या १,६१,८६७ एवढी झाली आहे, अशी माहिती आरोग्य खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे. तसेच काल नव्याने इस्पितळात २१ जणांना भरती करण्यात आले.
काल दिवसभरातील चोवीस तासांत राज्यात एकूण ३७०० एवढ्या स्वॅबच्या चाचण्या करण्यात आल्या. काल कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्याने १६२ जणांनी घरी विलगीकरणाचा निर्णय घेतला.

२१६४ सक्रीय रुग्ण
राज्यात या घडीला २१६४ एवढे सक्रीय रुग्ण आहेत. काल झालेल्या दोघांच्या मृतांमध्ये खोर्ली येथील एका ६२ वर्षीय वृद्धाचा तसेच आगोंद काणकोण येथील ६८ वर्षीय वृद्धाचा समावेश आहे.
सध्या डिचोली येथे ६६, साखळी ९८, पेडणे ५८, वाळपई ५१, म्हापसा ७८, पणजी ७१, हळदोणे ३५, बेतकी ३९, कांदोळी ८३, कासारवर्णे २३, कोलवाळ ४२, शिवोली ८०, पर्वरी ८६ व मये येथे १४ रुग्ण आहेत.
दक्षिण गोव्यात कुडचडे ६२, काणकोण ७८, मडगाव १३६, वास्को ७७, बाळ्ळी ३३, कासावली ६२, चिंचिणी ३६, कुठ्ठाळी १११, कुडतरी ५८, लोटली ६७, मडकई २२, केपे ७७, सांगे ८७, शिरोडा ६५, धारबांदोडा ८४, फोंडा १२३ व नावेलीत २० रुग्ण आहेत.

आतापर्यंत इस्पितळात उपचार घेतलेल्यांची संख्या २८,१२६ एवढी असून गृहविलिनीकरणात राहिलेल्यांची संख्या १,१५,४९९ एवढी आहे. राज्यात आतापर्यंत ९,३०,३३२ एवढ्या लोकांची कोरोना संसर्गाची चाचणी करण्यात आलेली आहे.