चोवीस तासांत कोरोनाने २ बळी, १३२ नवे रुग्ण

0
94

>> रुग्ण आढळण्याचे प्रमाण २.७२ टक्के

राज्यात चोवीस तासात नवे १३२ रुग्ण आढळून आले आहेत. तर, २ कोरोना रुग्णाच्या बळीची नोंद झाली आहे. राज्यातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या १४०९ एवढी झाली आहे. तर, कोरोना बळींची एकूण संख्या ३११३ एवढी आहे.

राज्यात जुलै महिन्यात कोरोना रुग्णांच्या बळीमध्ये चढउतार सुरू आहे. राज्यात नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण २.७२ टक्के एवढे आहे. इस्पितळांतून काल मंगळवारी १९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ६९ हजार ९७१ एवढी झाली आहे.

गेल्या चोवीस तासांत ४८३६ स्वॅबच्या नमुुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील १३२ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. नवीन १४ रुग्णांना दाखल करण्यात आले आहेत. नवीन ११८ जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे.

राज्यातील आणखी १५७ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ६५ हजार ४४९ एवढी झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३४ टक्के एवढे आहे.
राज्यातील सर्वच भागातील रुग्णसंख्या शंभरपेक्षा कमी झाली आहे.