चोवीस तासांत कोरोनाने एकाचा मृत्यू, १०८ बाधित

0
30

राज्यात गेल्या चोवीस तासांत कोरोनाची बाधा झालेले १०८ रुग्णसापडले असून एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या चोवीस तासांत ७५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील सध्या सक्रीय कोविड रुग्णांची संख्या ७३१ झाली असून राज्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ३२९० एवढी झाली आहे. काल राज्यात गेल्या चोवीस तासांत ५१३९ स्वॅब चाचण्या करण्यात आल्या.

कोविड पॉझिटिव्हिटी दर वाढून २.१ टक्क्यांवर पोहोचला आहे तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७१ टक्के एवढे आहे. गेल्या २४ तासांत इस्पितळांतून डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या १३ एवढी आहे. तर गेल्या २४ तासांत इस्पितळांत भरती करण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ११ एवढी आहे.

तसेच कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवल्याने ९७ जणांनी गृहविलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला आहे.
या घडीला राज्यात सर्वात जास्त रुग्ण मडगाव येथे असून त्यांची संख्या ९२ झाली आहे. त्या खालोखाल पर्वरीत ७१, पणजीत ६२, म्हापसा ४२, शिवोली ४१, चिंबल २९, काणकोण २७, कुठ्ठाळी २६, कांदोळी २६, फोंडा २६, अशी रुग्णसंख्या आहे.