चोवीस तासांत कोरोनाचा एकही बळी नाही

0
93

राज्यात नोव्हेंबर महिन्यात दुसर्‍यांदा एका दिवशी एकाही कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. तर, चोवीस तासांत नवीन १३६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४६ हजार ४८० एवढी झाली असून सध्याच्या रुग्णांची संख्या १३४३ एवढी झाली आहे. यापूर्वी १२ नोव्हेंबरला एकाही कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नव्हती. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ६७० एवढी आहे.

राज्यात कोरोना पॉझिटिव्ह आणखी १५७ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६६ टक्के एवढे आहे. बर्‍या झालेल्या कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४४ हजार ४६७ एवढी झाली आहे.

बांबोळी येथील कोविड प्रयोगशाळेत नवीन १६२१ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. कोरोनाचे सौम्य लक्षण असलेल्या आणखी १०० रुग्णांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. इस्पितळात नवीन ४१ कोरोना रुग्णांना दाखल करण्यात आले आहेत.
राज्यातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. पणजीतील कोरोना रुग्णांची सध्याची संख्या ९७ झाली आहे. फोंड्यात १११ रुग्ण, मडगाव परिसरात ८९ रुग्ण, वास्कोत ८६ रुग्ण, पर्वरी येथे ८७ रुग्ण, कुठ्ठाळी येथे ८६ रुग्ण, कांदोळी येथे ७२ रुग्ण, चिंबल येथे ६६ रुग्ण आहेत.

कोरोना सौम्य लक्षणे असलेले रुग्ण होम आयसोलेशनच्या पर्याय स्वीकारत असल्याने कोविड केअर सेंटरमधील रुग्णांची संख्या कमी होत असून कोविड केअर सेंटरमधील बहुतांश खाटा रिकाम्या आहेत. उत्तर गोव्यात कोविड केअर सेंटरमध्ये ७८ रुग्ण उपचार घेत आहेत. तर दक्षिण गोव्यातील कोविड केअर सेंटरमध्ये २१ रुग्ण उपचार घेत आहेत.