चोरी प्रकरणी युवतीस अटक

0
108

कळगुंट पंचायतचे पंच सदस्य पावल माथाएस् डिसोझा यांच्या घरी शुक्रवारी रात्री चोरट्यांनी एक लाखांचा ऐवज पळविला होता. याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी राबीया चव्हाण (२०) या तरूणीला आगशी येथे अटक केली. याप्रकरणी कळंगुट पोलीस स्थानकाचे निरीक्षक निलेश राणे, उपनिरीक्षक महादेव नाईक व मंगेश वळवईकर यांनी सापळा रचला व तिला आगशी येथे अटक केली.तिच्या सोबत असलेल्या संशयिताचा शोध कळंगुट पोलीस घेत आहेत. चोरट्यांनी घरातील गोदरेज कपाट उघडता न आल्याने त्यांनी जाताना घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट घडवून घर जाळण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांनी दिली. संशयित चव्हाण डिसोझा यांच्याकडे राहत होती. घरातील रोख २५ हजार, घड्याळे, मोबाईल, एक टिव्ही, कपडे, सीसी कॅमेरे, आदीची चोरी झाल्याची तक्रार डिसोझा यांनी कळंगुट पोलिसात दिली होती.