चोक्सीच्या हस्तांतरणास डॉमिनिका सरकार राजी

0
123

पंजाब नॅशनल बँकेत १३ हजार ५०० कोटींचा घोटाळा करून फरार झालेला आरोपी मेहुल चोक्सीविरोधात डॉमिनिका न्यायालयात बुधवारी सुनावणी झाली. यावेळी मेहुल चोक्सीचे भारताकडे हस्तांतरण करण्यास तयार असल्याची माहिती डॉमिनिका सरकारने आपल्या न्यायालयात दिली. या प्रकरणावरील सुनावणी गुरुवारपर्यंत तहकूब झाली असून, या निकालावर चोक्सीला भारतात आणता येणार की नाही, हे ठरणार आहे.