चिदंबरम यांच्या अटकेची आता ईडीलाही परवानगी

0
98

सीबीआयने अटक केलेली असतानाच अमंलबजावणी संचालनालयालाही (ईडी) आयएनएक्स मीडियाप्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांच्या अटकेसाठी विशेष न्यायालयाकडून परवानगी मिळाली आहे. त्यामुळे चिदंबरम यांच्यासाठी सुटकेचे सर्व मार्ग सध्या तरी बंद झाले आहेत.

आयएनएक्स मीडियाप्रकरणी सीबीआयने चिदंबरम यांना अटक केली असून त्यांना सध्या तिहार कारागृहात ठेवण्यात आले आहे. आपली जामिनावर सुटका व्हावी म्हणून चिदंबरम यांनी कालच सर्वोच्च न्यायालयात नव्याने अर्ज केला आहे. त्यात सीबीआय मला केवळ अपमानित करण्यासाठीच कारागृहात ठेवू पाहत असल्याचा आरोप केला आहे. या अर्जावर सुनावणी होत असतानाच दिल्लीतील विशेष न्यायालयाकडून चिदंबरम यांना मोठा झटका बसला आहे.