केंद्रीय निवडणूक आयोगाने गोव्यातील 4 मान्यताप्राप्त नसलेल्या राजकीय पक्षांना यादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
आयोगाने वर्ष 2019 पासून किमान एक निवडणूक लढवण्याच्या आवश्यक अटी पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याबद्दल गोव्यातील चार नोंदणीकृत मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना यादीतून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. गोव्यातील गोवा राष्ट्रवादी पार्टी (सत्तरी), गोवा प्रजा पार्टी (तिसवाडी), गोयकारांचो ओट्रेक असरो (सासष्टी) आणि युनायटेड गोवन्स पार्टी (तिसवाडी) हे चार पक्षांना राजकीय पक्षाच्या यादीतून वगळले जाणार आहेत. यासंबंधीची नोटीस जारी करण्यात आली आहे. निष्क्रिय आणि शोधण्यायोग्य नसलेल्या राजकीय पक्षांना काढून मतदार यादी स्वच्छ करण्याच्या प्रयत्नांचा हा एक भाग म्हणून ही कृती केली जात आहे.