चार खाणींसाठी आज तांत्रिक बोली

0
18

खाण आणि भूविज्ञान संचालनालयाच्या राज्यातील ४ खाणपट्‌ट्यांच्या ई-लिलावासाठी तांत्रिक बोली मंगळवार दि. २९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता पणजीतील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात उघडण्यात येणार आहेत. तांत्रिक बोली उघडण्यात येणार्‍या ठिकाणी फक्त बोलीदारांना प्रवेश दिला जाणार आहे. तांत्रिक बोलीमध्ये प्रति बोलीदाराला जास्तीत जास्त २ प्रतिनिधींना सहभागी होण्याची परवानगी दिली जाणार आहे. राज्यातील ४ खाणपट्‌ट्यांच्या लिलावासाठी राज्यासह देशातील अनेक खाण कंपन्या इच्छुक आहेत.