गोव्यातील दोन्ही जागा भाजप जिंकेल : जोशी

0
12

गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा भाजप प्रचंड बहुमताने जिंकेल, असा विश्वास केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी पत्रकारांशी बोलताना काल व्यक्त केला. आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचे काल गोव्यात आगमन झाले. प्रल्हाद जोशी यांनी म्हापसा येथील भाजपच्या कार्यालयात आयोजित बैठकीला उपस्थित राहून मार्गदर्शन केले.