गोव्याची पहिल्याच दिवशी सामन्यावर पकड

0
132

>> कूच बिहार चषक क्रिकेट

मडगाव क्रिकेट क्बबच्या मैदानावर कालपासून सुरू झालेल्या १९ वर्षांखालील कूच बिहार क्रिकेट लढतीत गोव्याने मणिपुरविरुद्ध पहिल्याच दिवशी मजबुत पकड मिळविलेली ओ. गोव्याच्या २०७ धावांच्या प्रत्युत्तरात मणिपुरच्या स्थिती ८ बाद ६४ अशी बिकट झालेली आहे. गोव्याकडून तेज गोलंदाज ऋत्विक नाईकने माणिपुरी फलंदाजी कापून काढताना केवळ १८ धावांत ६ गडी बाद केले.

गोव्याने प्रथम फलंदाजी करताना सर्व गडी गमावत २०७ अशी धावसंख्या उभारली होती. एकवेळ गोव्याची स्थितीही ६ बाद ९२ अशी बिकट झाली होती. परंतु पियुष यादवने एक बाजू लढवताना ८ चौकार व ३ षट्‌कारांसह ८४ चेंडूत ६९ धावांची दमदार खेळी करीत गोव्याला दोनशेच्या पार नेले. मणिपुरकडून जोतिन फेईरोईजामने ५ बळी मिळविले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा गोव्याच्या भेदक गोलंदाजीमुळे मणिपुरची स्थिती ८ बाद ६४ अशी झाली आहे. त्यांच्या पाओनाम सिंग (२४) आणि जोतिम फेईरोईजाम (२०) यांनाच दुहेरी आकडा गाठता आला.

संक्षिप्त धावफलक ः गोवा, पहिला डाव ः ५५.३ षट्‌कांत सर्वबाद २०७, (कौशल हट्टंगडी २५, कौशल सिंह २८, आयुष वेर्लेकर २५, पियुष यादव ६९, ऋत्विक नाईक १५ धावा. जोतिम फेईरोईजाम ५-५१, निंगथोउजाम सिंग ३-२९, सदानंदा ओक्रम २-५० बळी), मणिपुर, पहिला डाव, ३३.१ षट्‌कांत ८ बाद ६४, (पाओनाम सिंग २४, जोतिम फेईरोईजाम २० धावा. ऋत्विक नाईक ६-१८, हर्ष जेठाजी १-७, राहुल मेहता १-२२ बळी).