गोवा विधानसभा निवडणूक १५ मार्चपूर्वी

0
35

>> विद्यमान विधानसभेचा काळ मार्च २०२२ पर्यंत

गोवा विधानसभेचा कार्यकाळ १५ मार्च, २०२२ रोजी संपत असल्याची घोषणा काल भारतीय निवडणूक आयोगाने केली. १५ मार्च, २०२२ रोजी गोवा विधानसभेचा कार्यकाल संपत असल्याने राज्यात त्याच्यापूर्वी निवडणुका व्हायला हव्यात. निवडणूक आयोगाने या पार्श्‍वभूमीवर अधिकार्‍यांच्या नियुक्त्या व बदल्यासंबंधीची मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत.

ज्या राज्यात निवडणुका होत आहेत, त्या राज्यातील सरकारी अधिकार्‍यांच्या बदल्या ते ज्या जिल्ह्यातील आहेत तेथे केल्या जाऊ नयेत. तसेच ज्या ठिकाणी त्यांनी खूप वर्षे काम केलेले आहे अशा ठिकाणीही त्यांच्या बदल्या करू नयेत, असे ह्या मार्गदर्शक तत्त्वांतून स्पष्ट करण्यात आले आहे.

गोव्याबरोबरच उत्तरप्रदेश, मणिपूर, पंजाब, उत्तराखंड ह्या राज्यांच्या निवडणुकाही २०२२ साली होणार आहेत.