गोवा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. हरीलाल मेनन यांची नियुक्ती

0
57

गोवा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी प्रा. डॉ. हरीलाल मेनन यांची निवड करण्यात आली आहे. प्रा. मेनन हे गोवा विद्यापीठातील सागरी विज्ञान विभागाचे डीन आहेत. गोवा विद्यापाठीचे माजी कुलगुरु प्रा. वरुण साहनी यांचा कार्यकाल १८ ऑगस्ट रोजी संपला होता. त्यानंतर नव्या कुलगुरूंची नेमणूक होईपर्यंत विद्यापीठातील वरिष्ठ प्राध्यापक प्रा. जनार्दनम यांची प्रभारी कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. गोवा विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी २८० जणांचे अर्ज आले होते. छाननी समितीने त्यातील २५ जणांची निवड मुलाखतीसाठी केली होती. त्यात प्रा. मेनन यांचा समावेश होता.